Ad will apear here
Next
डॉ. अविराज तायडे यांना पहिला ‘पं. भीमसेन जोशी कलागंधर्व पुरस्कार’
डॉ. अविराज तायडेपुणे : कलाश्री संगीत मंडळातर्फे या वर्षीपासून संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना ‘पं. भीमसेन जोशी कलागंधर्व पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे. पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य व किराणा घराण्याचे गायक डॉ. अविराज तायडे हे यंदाच्या पुरस्काराचे मानकरी आहेत. रोख रुपये ११ हजार, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याची, माहिती कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक सुधाकर चव्हाण यांनी कळविली आहे.

 दि. २६ ते २८ जुलै  दरम्यान रंगणाऱ्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवात पंडितजींच्या कन्या शुभदा मुळगुंद यांच्या हस्ते डॉ. अविराज तायडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. औंध येथील पं. भीमसेन जोशी कलामंदिर येथे हा महोत्सव होणार असून, महोत्सवाचे हे सहावे वर्ष आहे. महोत्सवात आजवर अनेक मान्यवर गायक व वादक कलाकारांनी आपली कला सादर केली आहे.

तायडे हे किराणा घराण्याचे गायक असून, त्यांना त्यांच्या मातोश्री सुशीलाबाई यांच्याकडून संगीताचे बाळकडू मिळाले. सुरुवातीला संगीताचे औपचारिक शिक्षण त्यांनी देवरावजी भालेराव यांच्याकडून घेतले. त्यांनतर पं. रामभाऊ मते, पं. सी. आर. व्यास, पं. भीमसेन जोशी यांच्याकडून पुढील संगीत शिक्षण घेतले. सध्या ते मुंबईतील ‘एसएनडीटी’ विद्यापीठाचे अधिष्ठाता असून, नाशिकमधील ‘एसएमआरके’ महिला महाविद्यालयात विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आजवर भीमसेन रत्न पुरस्कार, अध्यापन एक्सलन्स अॅवॉर्ड, सेवा कला पुरस्कार आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZLQCC
Similar Posts
‘पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवा’त सुरांची बरसात पुणे : बरसणाऱ्या पाऊस धारांसोबत सुरांच्या बरसातीचा पुणेकर रसिकांनी मनमुराद आनंद घेतला. राग मधुकंस, दुर्गा, बिहाग, बागेश्री, मारुबिहाग यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवा’चे.
शून्य मी संपूर्ण... १० एप्रिल हा गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने, किशोरीताईंच्या आठवणींना उजाळा देणारा ‘शून्य मी संपूर्ण’ हा सुधीर कुलकर्णी यांचा दीर्घ लेख प्रसिद्ध करत आहोत. हा लेख ‘चतुरंग अन्वय’च्या २०१७च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाला होता.
‘स्वरमयी बैठकी’चे रविवारी आयोजन पुणे : डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशनच्या स्वरमयी गुरुकुलतर्फे येत्या रविवारी, १६ जून २०१९ रोजी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका तुलिका घोष यांच्या ‘स्वरमयी’ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
‘म. फुले यांच्या अखंडांना नीला भागवत यांच्या बंदिशींमुळे नवी ओळख’ पुणे : येथील ‘सारीशा आर्टस्’ या स्त्रियांच्या चित्रपट निर्मिती संस्थेतर्फे ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका नीला भागवत यांच्या संगीत प्रवासावर आधारित ‘समांतर’ या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे. नीला भागवत या केवळ ग्वाल्हेर घराण्याच्या शास्त्रीय गायिका नसून, त्यांनी संत कबीर,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language